पहिल्या सभेनंतर प्रियंका गांधींचे पहिले ट्वीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा गुजरातमधील गांधीनगर येथे जाहीर सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. तंसच जाहीर सभेसोबत त्यांनी काल ट्विटरवरही आगमन केले आहे. त्यांनी काल पहिलं ट्वीट केले आहे.

प्रियंका गांधी यांनी फेब्रुवारी 2019 मध्येच ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. मात्र कोणतेही ट्वीट केले नव्हते. त्यांनी मंगळवारी पहिलं ट्विट केलं. पाच मिनिटांच्या अंतरावर प्रियंका गांधी यांनी दोन ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी साबरमती आश्रमामधील फोटो टाकला आहे. साबरमतीच्या साध्या प्रतिष्ठेत सत्यतेचं वास्तव्य आहे, कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

तर दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा संदेश दिला आहे. मी हिंसाचारचा निषेध करतो कारण जेव्हा ते चांगले दिसते तेव्हा चांगले चांगलेच असते. आणि जे वाईट आहे ते कायम असते, असा संदेश त्यांनी ट्वीट मध्ये दिला आहे.

दरम्यान, काल झालेल्या सभेत त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. मतदारांना प्रामाणिकपणे मतदान करण्याचे आव्हान त्यांनी केलं. तसंच ज्यांनी हा देश घडवला त्या प्रत्येकाने योग्य प्रश्न विचारणे आवश्यक आहे. हा देश तुमचा आहे. त्यामुळे ज्यांनी तुम्हाला आश्वासनं दिली, त्यांना प्रश्न विचारण्यास शिका, असंही त्यांनी सांगितलं.

ह्याही बातम्या वाचा –

पिंपरीत हॉटेल चालकावर खुनी हल्ला

कॅप्टनकडून लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग

पंतप्रधान पदाबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

अहमदनगर : ॲक्सिस बँकेच्या ‘सीईओ'(CEO), ‘एमडी'(MD)विरुद्ध गुन्हा

अहमदनगर : निवडणूक कामांसाठी समन्वय समित्या स्थापन