प्रियंका गांधींनी केली ‘ही’ चुक ; सोशल मीडियावर झाल्या ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज मराठी वर्षाला सुरुवात होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्र- गोव्यात गुढीपाडवा, उत्तर भारतात नवरात्री, दक्षिण भारतात उगादी, तर जम्मू-काश्मीरमध्ये नवरेह असे सण साजरे केले जातात. त्या सर्वा राजकारणी आपल्या जनतेला या सणांच्या शुभेच्छाही देतात. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही काश्मीरच्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देताना त्यांनी नवरेह ऐवजी नवरोज असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

‘नवरोज’ हाही एक सण आहे. मात्र हा सण पारशी समुदायाचा आहे. त्यामुळे काश्मीरी लोकांना नवरोजच्या शुभेच्छा देण्याची चूक प्रियंका गांधींकडून झाली आहे. माझ्या काश्मिरी बंधू आणि भगिनींना नवरोजच्या शुभेच्छा, काल मला रोड शोमुळे थाळी बनवायला वेळ मिळाला नाही. मात्र जेव्हा मी रोड शो नंतर घरी आले तेव्हा डायनिंग टेबलावर माझी थाळी आधीच लागली होती. आई किती प्रेमळ असते, असं ट्वीट प्रियंका गांधींनी केले आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी नवरोजच्या शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्यांना आठवण करुन दिली नवरोज हा पारशी लोकांचा सण आहे. काश्मीरमध्ये नवरेह साजरा केला जातो. तसेच प्रसिद्ध लेखक तारेक फतेह यांनी रिट्विट करत प्रियंका गांधींना त्यांच्या चुकीची आठवण करून दिला. नवरोज हा सण मागील महिन्यात साजरा केला गेला आहे. काश्मीरमध्ये नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी जो सण साजरा केला जातो त्याला नवरेह नावाने ओळखलं जातं, असं त्यांनी ट्वीट केले आहे.