प्रियांका गांधींच्या फोटोवर अश्लिल टीका करणाऱ्याला अटक

पाटणा : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या नवनिर्वाचीत सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या फोटोशी छेडछाड करून, त्यावर टीका करणाऱ्या अरोपीला अटक करण्यात आली आहे. बिहार पोलीसांनी ही कारवाई केली आहे. योगी सूरजनाथ असं या आरोपीच नाव आहे. तो स्वतःला मोदींचा भक्त सांगतो.

सुरजनाथने प्रियांका गांधी यांच्या फोटोशी छेडछाड करत त्यावर सोशल मीडियावर अश्लिस टीका केली आहे. त्याने ३० जानेवारीला ट्वीट केले होते. त्याबाबत पोलीसांना तक्रार मिळाल्याचं पोलीसांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते शाहीन सैय्यद यांनी याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सूरजनाथला कटिहारमधून शोधून काढलं. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन, त्याला कोर्टात हजर केलं. त्यानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले.

दरम्यान, योगी सूरजनाथ हा बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील बिनोदपूर परिसरातील रहिवासी आहे. तो ट्विटरवरील ‘मिशन भाजप २०१९’ चा उत्साही फॉलोअर आहे. मात्र या व्यक्तीशी आपला काहीही संबंध नाही, असं भाजप जिल्हा प्रमुख मनोज राय यांनी सांगितलं.