निक जोनस सोबत प्रियांका हनीमूनला रवाना, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला पहिला फोटो 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये झालेल्या रॉयल वेडिंग नंतर निक आणि प्रियांकाने दिल्लीमध्ये ग्रँड रिसेप्शन पार्टी  दिली. या पार्टी नंतर लवकरच ती बी-टाऊनमधील कलाकारांसाठी देखील असे रिसेप्शन ठेवणार आहे. मात्र या रिसेपशन आधी दोघे हनीमूनसाठी रवाना झाले आहेत. प्रियांका आणि निक दोघेही आपल्या रिसेप्शननंतर ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेरिमनीमध्ये सहभागी झाले होते. हे कपल आता न्यू मॅरिड कपल हनीमूनसाठी रवाना झाले आहेत.

प्रियांकाने  निकसोबत असलेला तिचा एका फोटो देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या मध्ये निक सेल्फी घेताना दिसतोय. प्रियांकाच्या प्रोफेशनल लाईफबाबतच बोलायचे झाल्यास ती लवकरच आपल्या ‘द स्काय इज पिंक’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यापाठोपाठ लगेच ती संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार आहे.

भन्साळींच्या सिनेमात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असून तिचा हा सिनेमा मुंबई येथील  कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची संपूर्ण माहिती दिली आहे. सिनेमाचे कथानक यावर आधारित असेल. असे असले तरी वर्षभरापूर्वी या सिनेमाबद्दलची बातमी आली होती. भन्साळी आणि प्रियांका या सिनेमासाठी एकत्र येणार,अशा बातम्या देखील प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यानंतर प्रियांकाने हा सिनेमा सोडल्याच्या ही अफवा होत्या.

१ डिसेंबर रोजी प्रियांका व निक यांनी जोधपूरच्या उमेद भवनात ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.यानंतर लगेच २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने विवाह केला. दोन्ही  विवाह पार पडल्यानंतर आता हे जोडपे बी-टाऊन येथे हनिमून साठी निघाले आहेत.