प्रियंकाचा पती निक सोबत दिसली हिना खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिना खान सध्या कांस फिल्म फेस्टीवल मध्ये दिसून आली आहे. आपला आगामी सिनेमा लाईन्स ला प्रमोट करण्यासाठी ती आली आहे. या फेस्टीवल मध्ये हिनाचे एकापेक्षा एक लुक पाहायला मिळाले. तिचे हे लुक सर्वांनाच खूप आवडल्याचे दिसून आले. हिना तिच्या या लुकमुळे चर्चेत आली आहे. हिनाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हिना खूपच हॉट दिसत आहे.

हिनाने जे फोटो सोशलवर मीडियावर शेअर केले आहेत त्यात तिने ब्लॅक गोल्डन कलरचा आऊटफिट केल्याचे दिसत आहे. हिना खानचा हा लुक प्रियंका चोपडाच्या पार्टीचा आहे ज्यामध्ये हिना सोबत हुमा कुरेशी आणि डायना पेंटी देखील दिसत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, हिना इमोशनल मेसेजनंतर प्रियंकानेदेखील उत्तर देताना म्हटले होते की, तिला हिनाला आणखी पुढे जाताना पाहायचे आहे.

हिना, प्रियंका, हुमा यांच्या फोटोला तब्बल साडे सात लाख लोकांनी लाईक केले आहे. त्याच्या इतर फोटोंनादेखील लाखोंच्या संख्येत लाईक्स आहेत. तिच्या चाहत्यांना तिच्या फोटोंची नेहमीच प्रतिक्षा असते. हिना खानला तब्बल 5 लाखांहून अधिक लोक इंस्टाग्रामवर फॉलो करतात. तिचे अनेक चाहते तिच्या फोटोंवर कमेंट करत तिचे कौतुकदेखील करत असतात. सोशलवर हिना नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो याआधीही अनेकदा व्हायरल झाले आहेत.