प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वाचं वेळापत्रक जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

प्रो-कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमाला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. प्रो-कबड्डी लीगचे हे सहावे पर्व असणार आहे. प्रो-कबड्डीचा लीगचा  तीन महिन्यांचा असणार आहे. अंतिम सामन्याचा बहुमान मुंबईला मिळाला आहे . १३ विविध शहरांमध्ये या लीगचे सामने खेळवण्यात येतील आणि ५ जानेवारी २०१९ ला अंतिम सामना मुंबईत होणार आहे. सहाव्या पर्वाचा पहिला सामना तेलगू टायटन्स आणि तामिळ थलायवा यांच्यात होणार आहे.

याचसोबत यंदाच्या हंगामाचा अंतिम सामना हा मुंबईमध्ये खेळवला जाणार आहे. ९ ते १५ नोव्हेंबर या काळात मुंबईकरांना हे सामने प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहता येणार आहेत. तर पुण्यातील कबड्डीप्रेमींना १९ ते २४ ऑक्टोबरदरम्यान प्रो-कबड्डीचा आनंद घेता येणार आहे.
प्रो-कबड्डी लीगला २०१४  साली सुरुवात झाली होती. प्रो-कबड्डीच्या पहिल्या हंगामात जयपूर पिंक पँथर्स संघाने बाजी मारली होती. त्यानंतर दुसऱ्या हंगामात यु मुंबा या संघाने जेतेपद पटकावले होते. पटणा पायरेट्स या संघाने आतापर्यंत तीनदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.
[amazon_link asins=’B07FSV992S,B07FM8DG3Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e73ae84-a6b1-11e8-a539-d13bd13f28d2′]
 वेळापत्रक –
चेन्नई – ५ ते ११ ऑक्टोबर २०१८
सोनीपत – १२ ते १८ ऑक्टोबर २०१८
पुणे – १९ ते २४ ऑक्टोबर २०१८ (इंटरझोन आठवडा)
पाटणा – २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर (इंटरझोन आठवडा)
नोएडा, उत्तर प्रदेश – २ ते ८ नोव्हेंबर २०१८
मुंबई – ९ ते १५ नोव्हेंबर २०१८
अहमदाबाद – १६ ते २२ नोव्हेंबर २०१८ (इंटरझोन आठवडा)
बंगळुरु – २३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०१८
दिल्ली – ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१८ (इंटरझोन आठवडा)
हैदराबाद – ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०१८ (इंटरझोन आठवडा)
जयपूर – १४ डिसेंबर ते २० डिसेंबर
कोलकाता – २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर (वाईल्ड कार्ड आठवडा)
कोची – ३० डिसेंबर २०११८ क्वालिफायर १ आणि २
३१ डिसेंबर २०१८ – क्वालिफायर ३ आणि एलिमीनेटर १
मुंबई – ३ जानेवारी दुसरा एलिमीनेटर सामना
५ जानेवारी अंतिम सामना