अमेरिकेत जमावाला हिंसक वळण, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय झाले ?

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump)
यांच्या समर्थकांनी बुधवारी यूएस कॅपिटलमध्ये घुसून गोंधळ घातला. गोंधळ आणि हिंसा एवढी वाढली की, एका महिलेचा बळी गेला. यूएस कॅपिटलच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था भेदून हिंसक जमाव आत घुसला तेव्हा खासदारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. वॉशिंग्टन डीसीच्या मेयरने राजधानीत कर्फ्यूची घोषणा केली. तर आपल्या भाषणात निवडणुक गोंधळाचा आरोप करणार्‍या ट्रम्प (President Donald Trump) यांनी हिंसा भडकल्यानंतर आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले.

तर, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी या हिंसेला राजद्रोह म्हटले आहे. जाणून घ्या कॅपिटल हिंसा प्रकरणात आतापर्यंत काय-काय झाले :

– अमेरिकन निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेल्या पराभवाचा निकाल पलटवून टाकण्यासाठी शेकडो ट्रम्प समर्थक बुधवारी यूएस कॅपिटलमध्ये घुसले.

– यूएस कॅपिटलमध्ये हिंसक चकमकीमुळे खासदारांना यूएस कॅपिटलमधून पळ काढावा लागला आणि नंतर एका महिलाचा मृत्यू झाला. हिंसेमुळे जो बाइडेन यांना निवडणुकीतील विजयाचे सर्टिफिकेट देण्याच्या प्रक्रियेत सुद्धा उशीर होत होता. मात्र, जमावाच्या हल्ल्याच्या सुमारे 6 तासापेक्षा जास्त काळानंतर सीनेटची कार्यवाही पुन्हा सुरू झाली.

– अमेरिकन तपास एजन्सी एफबीआयने सांगितले की, त्यांनी दोन संशयित स्फोटके निष्क्रिय केली आहेत आणि अधिकार्‍यांनी हल्ल्याच्या 4 तासानंतर यूएस कॅपिटलला ’सुरक्षित’ घोषित केले.

– ट्रम्प यांनी काही ट्विट केली, ज्यामध्ये त्यांनी निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला. हे ट्विट पोस्ट झाल्यानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट 12 तासांसाठी ब्लॉक केले आणि इशारा दिला की, जर त्यांनी हिंसा भडकावण्यासारखे काही पोस्ट केले तर त्यांचे अकाऊंट नेहमीसाठी ब्लॉक केले जाईल.

– नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी स्थिती सामान्य करण्याचे आवाहन केले आणि ट्रम्प यांना खडेबोल सुनावले.

-अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी हिंसा उसळवली. कायदेशीर पद्धतीने झालेल्या निवडणुकीवर सातत्याने बिनबुडाचे दावे करणार्‍या सध्याच्या राष्ट्राध्यक्षाद्वारे आज युएस कॅपिटलमध्ये भडकावण्यात आलेली हिंसा इतिहासात नेहमी आपल्या देशाला लाजिरवाणी म्हणून आठवली जाईल.