Problems With Uric Acid | युरिक अ‍ॅसिडची समस्या जाणवतेय?; मग दही खाण्यापुर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Problems With Uric Acid | दही (Curd) खाल्ल्याने उन्हाळ्याच्या हंगामात गारवा निर्माण होतो. या काळात दही खावेसे वाटते. दही खाणे चांगले की वाईट? हा सवाल देखील उपस्थित होतो. मात्र, दही हा पदार्थ प्रोटीनचा (Protein) अर्थात प्रथिनांचा एक महत्वाचा स्त्रोत आहे. उन्हाळ्यात अनेक लोक दह्याचे सेवन करत असतात. पण युरिक अ‍ॅसिडची समस्या असलेल्या व्यक्तींची अशी शंका आहे की दह्यातील प्रथिनाची मात्रा युरिक अ‍ॅसिड (Problems With Uric Acid) वाढवण्याला कारणीभूत ठरू शकते. शरीरातील प्रोटीनची मात्रा जादा झाल्यास युरिक अ‍ॅसिड वाढण्याची शक्यता असते. पण दह्याच्या सेवनामुळे या रुग्णांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही. (do you have uric acid problems then know these things before eating yogurt)

 

दही खाल्ल्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढत नाही. तसेच, याउलट जर तुम्ही उन्हाळ्यात दह्याचे सेवन केल्यास तुमची पचनशक्ती मजबूत होते. त्याचबरोबर, दही तुम्हाला ताजेतवाने करण्यास सहकार्य करते. असा दावा एका रिपोर्ट्सनुसार करण्यात आला आहे. तसेच युरिक अ‍ॅसिडची समस्या (Acidity Problem) असणाऱ्या रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याने या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी दह्याचे सेवन फायदेशीर (Beneficial Consumption of Curd) ठरू शकते. याचा अर्थ तुम्ही प्रथिनांनी भरलेले सर्व प्रकारचे पदार्थ खाऊ शकता. यामुळे तुमचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. तुम्ही प्रथिनांनी भरलेले सर्व प्रकारचे पदार्थ खाऊ शकणार आहात. (Problems With Uric Acid)

 

युरिक अ‍ॅसिडची लक्षणे (Symptoms Of Uric Acid) –

– जर तुम्हाला सांधेदुखी असेल आणि तुम्हाला उठताना आणि बसण्यात अडचण येत असेल, तर ते युरिक अ‍ॅसिडचे मुख्य लक्षण आहे.

– याशिवाय बोटांना सूज येणे हे देखील युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे लक्षण आहे.

– तसेच, जर तुमच्या सांध्यांमध्ये गाठी तयार होत असतील तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.

 

दही खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Curd) –

– दह्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

– यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

– दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही दह्याचे सेवन करू शकता.

– याशिवाय हृदय सुरक्षित ठेवण्यासाठीही दही फायदेशीर आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Problems With Uric Acid | do you have uric acid problems then know these things before eating yogurt

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा