NRC संपूर्ण देशात लागू होईल, सरकार वकीलही देणार : HM अमित शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) बद्दल राज्यसभेत मोठी घोषणा केली. लवकरच एनआरसी देशभरात लागू करण्यात येईल. या नोंदीच्या प्रक्रियेत धर्माच्या आधारे कोणाविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही अशी माहिती अमित शहा यांनी आज विरोधी पक्षांकडून एनआरसी या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

अमित शहा म्हणाले की,’ कोणत्याही धर्माच्या नागरिकांना यावरून घाबरण्याचे कारण नाही. एनआरसीमध्ये धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. एनआरसीमध्ये सर्व लोक एकत्रित करण्याची व्यवस्था आहे. सर्व धर्मांचे निर्वासित बाहेरून आले आहेत. त्यांना नागरिकत्व दिले जाईल. जेव्हा एनआरसी प्रक्रिया संपूर्ण देशात होईल, तेव्हा पुन्हा एनआरसी प्रक्रिया आसाममध्ये करण्यात येईल. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक परत आणले जाईल. एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती विधेयक या वेगळ्या प्रक्रिया आहेत. एनआरसीशी त्याचा काही संबंध नाही.’

एनआरसीला ममता बॅनर्जींचा विरोध –
दरम्यान बंगालमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी यांनी बंगालमध्ये एनआरसीला विरोध दर्शवला आहे.

आसाम एनआरसीची पहिली यादी कधी प्रसिद्ध झाली-

आसामच्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सची (NRC) अंतिम यादी 31 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 19 लाखाहून अधिक लोकांना वगळण्यात आले आहे. आसाममधील 3,30,27,661 लोकांनी एनआरसीमध्ये जाण्यासाठी अर्ज केला होता. 19,06,657 लोकांना अंतिम यादीतून काढून टाकण्यात आले, तर 3,11,21,004 लोकांना भारतीय नागरिक म्हणून घोषित करण्यात आले. आपले नाव पाहण्यासाठी आपण nrcassam.nic.in वर क्लिक करू शकता किंवा https://assam.gov.in/ या लिंकवर जाऊन यादीतील नाव पाहू शकता.

Visit :  Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like