‘या’ राज्यातील 11 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना डिसेंबरपासून मिळणार मोफत ‘स्मार्टफोन’

चंदीगड : वृत्तसंस्था – पंजाबच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी राज्यातील तरुणांना मोफत स्मार्टफोन देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी कॉंग्रेसने तरुणांना स्मार्टफोन देण्याचे आश्वासन दिले होते. मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे ही योजना डिसेंबरपासून लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात सरकारी शाळांमधील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन दिले जातील.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पारदर्शक प्रक्रियेद्वारे कंपनीची निवड केली जाईल आणि पंजाब माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेडकडून निविदा कागदपत्रे जाहीर केली जातील, असे या निवेदनात म्हटले आहे.

Visit – policenama.com