‘कर्मयोगी’, ‘राज तिलक’चे निमाृते अनिल सुरी यांचा ‘कोरोना’मुळं मुंबईत मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्मयोगी, राज तिलक या चित्रपटाचे निर्माते अनिल सुरी यांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यु झाला. ते ७७ वर्षांचे होते. लिलावती आणि हिंदुजा या दोन्ही रुग्णालयांनी त्यांना दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांचे बंधु राजीव सुरी यांनी केला आहे.

अनिल सुरी यांना २ जून रोजी त्यांना ताप आल्यानंतर त्यांनी प्रकृती खालावली. अशा अवस्थेत त्यांना लिलावती आणि हिंदुजा रुग्णालयांनी बेड नसल्याचे सांगत दाखल करुन घेण्यास नकार दिला, असे त्यांचे बंधु राजीव सुरी यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना विले पार्लेमधील अ‍ॅडवान्स्ड मल्टिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या कोविड १९ च्या चाचण्या केल्या. त्या पॉझिटिव्ह आल्या. त्यानंतर यांची प्रकृती खालवत गेली व त्यांचा मृत्यु झाला.

कर्मयोगी आणि राज तिलक यासारख्या चित्रपटांची निर्मिती करणार्‍या अनिल सूरी यांनी ८० च्या दशकात राजेश खन्ना, फराह, जितेंद्र आणि सदाशिव अमरापूरकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बेगुनाह या चित्रपटाची निर्मिती केली होती. परंतु हा चित्रपट पूर्ण होऊनही कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही.