पहिल्याच ऑडिशनमध्ये सोनू सूद झाला होता ‘शर्टलेस’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउन कालावधीत सोनू सूद रिअल लाइफमध्ये अनेकांचा हिरो ठरला आहे. त्याने गरजुंना मदत करत अनेकांची मने जिंकली आहेत. मात्र आज लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याचा कलाविश्वातील प्रवास काही सोपा नव्हता. एका मुलाखतीमध्ये त्याने पहिल्या चित्रपटाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. यात पहिल्याच चित्रपटासाठी त्याला शर्टलेस व्हावे लागल्याचे सांगितले आहे.

पहिल्याच चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेलेल्या सोनू सूदला निर्मात्यांनी शर्टलेस होऊन बॉडी दाखवण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याची बॉडी पाहून पहिला चित्रपट मिळाला होता. मी मुंबईत पोहोचलो आणि तिथूनच माझ्या संघर्ष काळाची, स्ट्रगलची सुरुवात झाली. मी रोज एका ऑफिसमधून दुसर्‍या ऑफिसमध्ये अशा फेर्‍या मारत होतो. माझे फोटो त्यांना दाखवत होतो. पण सतत रिजेक्ट होत होतो. त्यावेळी मुंबईचे रस्ते पायदळी तुडवण्यातच माझे 1- 2 वर्ष निघून गेले.

त्यामुळे माझ्या करिअरची सुरुवात कुठून होणार हा प्रश्न सतत सतावत होता. त्यावेळी तामिळ भाषेचा एक कॉर्डिनेटर होता. त्याला माझे फोटो आवडले आणि त्याने मला चेन्नईला बोलवून घेतले. त्याच्या एका फोनवर मी चेन्नईला पोहोचलो आणि पहिला चित्रपट साईन केला, असे सोनू सूदने सांगितले. माझी शरीरयष्टी पाहून ती चित्रपटासाठी योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी प्रथम मला शर्टलेस व्हायला सांगितले. त्यानंतर तुझी शरीरयष्टी अगदी योग्य आहे. आम्ही तुझ्यासोबत काम करु असे निर्मात्यांनी सांगितले.