‘मुलायम, उध्दव, धीरूभाई… घराणेशाही कुठं नाही ?’, रामगोपाल वर्माचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच तापताना दिसत आहे. डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनी विविध क्षेत्रात असणाऱ्या घराणेशाहीची उदाहरणं देत बॉलिवूडचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.

डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केलं आहे. यात त्यांनी बॉलिवूडमधील घराणेशाही स्विकारली आहे परंतु इतर ठिकाणी कशी घराणेशाही हे सांगितलं आहे. देशातील राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील काही घराण्यांचा उल्लेख करत राम गोपाल वर्मा म्हणाले, “मुलायम सिंह यादव, उद्धव ठाकरे, यांच्यासारखे राजकारणी आपल्या मुलांना, नातलगांना जसं पहिलं प्राधान्य देतात, धीरूबाई अंबानी मुकेश आणि अनिल यांना जशी आपली संपत्ती देतात, इतर सारेच कुटुंब ज्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य देतात, बॉलिवूडमधील कुटुंबही अगदी तसंच करतं. मग घराणेशाही कुठं नाहीये?” असा सवालही त्यांनी केला आहे.

सुशांतच्या आत्महत्येचा तपास आता पोलीस प्रत्येक अँगलनं करत आहेत. कारण त्यांच्या आत्महत्येनंतर आता अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत.

सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता.