हरभजन सिंहनं सुरू केली दुसरी ‘इनिंग’, ‘या’ सिनेमात साकारणार मुख्य भुमिका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारताच्या दिग्गज क्रिकेटर्सपैकी एक हरभजन सिंग क्रिकेटचं पीच सोडून आता सिनेमात आपलं नशीब आजमावणार आहे. लवकरच तो सिनेमात आपल्या करिअरला सुरुवात करणार आहे. हा एक तमिळ सिनेमा आहे. फ्रेंडशिप असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात हरभजन प्रमुख भूमिका साकारणार आहे. या सिनेमात त्याची हिरोईन म्हणून श्रीलंकेची न्यूज अँकर लोसलिया मारियानेसान हिला निवडण्यात आलं आहे. सिनेमाच्या डायरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर जॉन पॉल राज आणि शाम सुंदर मिळून हा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत.

सिनेमाच्या जगात आपलं नशीब आजमावमारा हरभजन सिंग हा काही पहिलाच खेळाडू नाहीये. क्रिकेटर अजय जडेजा यानंही मैदान सोडून पडद्यावर नशीब आजमावलं आहे. परंतु त्याला म्हणावं तसं यश काही मिळालं नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानंही काही वर्षांपूर्वी भारतीय सिनेमांमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे.

हरभजन सिनेमाच्या या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाची स्टोरी काय असणार आहे याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. कलाकारांची निवड पूर्ण झाल्यानंतर निर्माते या सिनेमाच्या स्टोरीबद्दल माहिती देतील. अद्याप मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही. चाहत्यांची उत्सुकता मात्र आताच शिगेला पोहोचली आहे.