दिग्दर्शक करण जोहरच्या घरात ‘कोरोना’चा शिरकाव, दोघांना बाधा

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लॉकडाउन जारी करुनही कोरोनाचा फैलाव थांबलेला नाही. संसर्ग कमी करण्यासाठी सुरु असलेल्या चौथ्या लॉकडाउनमधेही अनेकांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटीपर्यंत कोरोनाची बाधा होत आहे. त्यातच चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या घरी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

https://twitter.com/karanjohar/status/1264942040199999490

घरात काम करणार्‍या दोन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. संंबंधित कर्मचार्‍यांना कोरोना झाल्याचे लक्षात येताच करणने याविषयीची माहिती बीएमसीला दिली. त्यानंतर दोन्ही व्यक्तींना करणच्या घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याची संपूर्ण इमारत सॅनिटाइज करण्यात आली आहे. कुटुंबातील अन्य लोक आणि संपूर्ण स्टाफ सुरक्षित आहे. इतरांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. आम्ही सकाळीच सगळ्यांनी कोरोनाची चाचणी केली. मात्र सगळ्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. परंतु, सुरक्षेच्यादृष्टीने आम्हा सगळ्यांना 14 दिवस विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती करणने दिली. घरातील ज्या दोन सदस्यांना लागण झाली आहे, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. हा कठीण क्षण असून घरात राहून आणि योग्य ती काळजी घेऊन आपण संकटावर मात करु. सगळ्यांनी घरात रहा आणि काळजी घ्या. असे आवाहन त्याने केले आहे .