Coronavirus : काय सांगता ! होय, जैविक अस्त्र म्हणूनच चीनकडून कोरोनाची निर्मिती, डॉ. फ्रान्सिस बॉयल यांचा आरोप

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूची निर्मिती जैविक अस्त्र म्हणूनच करण्यात आली होती. चीनने वुहान पी 4 या प्रयोगशाळेत हे जैविक अस्त्र तयार केले. इतर देशांतून संहार घडवून आणणे हा यामागील उद्देश होता. परंतु काही कारणांमुळे हा विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडला आणि वुहानमधून हुबेई प्रांतात पसरला, असे जैविक अस्त्र कायद्याचे जनक डॉ. फ्रान्सिस बॉयल यांनी आरोप केला आहे.

एका मुलाखतीत डॉ. फ्रान्सिस यांनी स्पष्ट केले की, जैविक अस्त्र कायद्यानुसार चीनने केलेला हा एक मानवतेविरुद्धच्या अपराधाच्या श्रेणीत मोडणारा गुन्हा आहे. जागतिक आरोग्य संघटना देखील या गुन्ह्याचा मूक साक्षीदार आहे, असे देखील ते म्हणाले.

डॉ. फ्रान्सिस आंतरराष्ट्रीय कायदा या विषयाचे प्राध्यापक आहेत, ते सध्या ‘इल्लिनॉईस कॉलेज ऑफ लॉ’ मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी अमेरिकेतील जैविक अस्त्र परिषदेदरम्यान देशांतर्गत अंमलबजावणीसाठी ‘बायोलॉजीकल वेपन्स अँटी टेररिज्म अ‍ॅक्ट’चा मसुदा तयार केला होता. जॉर्ज बुश यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांतून तो कायदा म्हणून देखील मंजूर झाला होता.

दरम्यान डॉ. फ्रान्सिस यांनी मुलाखतीत कोरोना विषाणूबाबत सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, ‘चीनच्या वुहानमधील बीएसएल-4 लॅब केवळ चीनचे व्हायरॉलॉजी सेंटर नसून ते जागतिक आरोग्य संघटनेची संशोधन शाळा देखील आहे. एकूणच चीन आणि जागतिक आरोग्य संघटना अशी दोघांची संयुक्त ही एक प्रयोगशाळा आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेत काय चालते, ते जागतिक आरोग्य संघटनेपासून लपलेले नसते.’

चीनने कॅनडाच्या प्रयोगशाळेतून चोरला कोरोना!

तसेच डॉ. फ्रान्सिस यांनी एक मोठा गौप्यस्फोटही केला. ते म्हणाले की, चीनने कोरोना विषाणूचे मटेरियल हे कॅनडाच्या प्रयोगशाळेतून चोरले आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.