पुणे जिल्ह्यातील जवळार्जुन येथे उसाच्या शेतात गांजाचं उत्पादन, प्रचंड खळबळ

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे महेश शामराव पवार यांच्या उसाच्या शेतात लावलेली सुमारे साडेतीन लाख रुपयांची गांजाची झाडे जेजुरी पोलिसांनी जप्त केली असून याबाबत शेतकऱ्याला ताब्यात घेतले असल्याचे जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.

या प्रकरणाबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या जवळार्जुन गावातील महेश शामराव पवार यांच्या मालकीच्या जमीन गट नंबर ७४० या क्षेत्रात उसाच्या पिकात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती जेजुरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना मिळाली होती. त्यानूसार जवळार्जुन येथे जाऊन उसाच्या शेतात लावलेली सुमारे साडेतीन लक्ष रुपयांची २३ किलो वजनाची १९ झाडे जप्त केली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अतिरिक्त अधीक्षक जयंत मीना तसेच भोर विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माने यांच्यासह उपनिरीक्षक विजय वाघमारे, सहाय्यक फौजदार शिवा खोकले, पोलीस हवालदार गणेश दाभाडे, संतोष अर्जुन, संतोष मेढेकर, संदीप कारंडे, अक्षय यादव, विशाल रासकर, धर्मवीर खंडे, गणेश कुतवळ, अतुल मोरे, प्रवीण शेंडे, भानुदास सरक, के. एच. तुपे, ए.बी राऊत यांनी केली.

शेतकरी महेश पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –