प्रा. निळकंठ हजारे यांची समीक्षणसाठी निवड

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन – आपेगाव येथील जयकिसान कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विषयाचे प्रा. निळकंठ हजारे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे कडून बारावीच्या ‘शिक्षणशास्त्र’ विषयाच्या मसुद्याचे समीक्षण करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

२०२०- २०२१ या शैक्षणिक वर्षापासून बारावीचा सर्व विषयाचा नवीन अभ्यासक्रम लागू होत आहे. नवीन सर्व विषयांचे पुस्तक तयार करण्यासाठी त्यांचा कच्चा मसुदा तयार झालेला आहे. बारावीच्या शिक्षणशास्त्र या विषयाच्या नवीन मसुद्याचे समीक्षण करण्यासाठी प्रा. हजारे यांची निवड करण्यात आली असून डिसेंबर १ व २ या दोन दिवशी पुणे येथील मंडळाच्या कार्यालयात या अंतिम मसुद्याचे समिक्षण करण्यात येणार आहे.

या अगोदर देखील प्रा. हजारे यांनी औरंगाबाद, नागपूर व अमरावती या विभागातील प्राध्यापकांना अकरावीच्या शिक्षणशास्त्र या नवीन पुस्तकाचे प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव जयजीत बापू शिंदे, मुख्याध्यापक राम नागीशे, पर्यवेक्षिका व्ही. एस. शिंदे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Visit : Policenama.com

You might also like