Prof Santishree Dhulipudi Pandit | पुण्यातील प्राध्यापिकेने घडवला इतिहास ! JNU च्या पहिल्या महिला कुलगुरु होण्याचा मिळवला मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या Savitribai Phule Pune University (SPPU) प्राध्यापीका शांतीश्री धुलीपुडी पंडित (Prof Santishree Dhulipudi Pandit) यांची जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (Jawaharlal Nehru University) नवीन कुलगुरुपदी (Vice-Chancellor) निवड झाली आहे. शांतीश्री पंडित (Prof Santishree Dhulipudi Pandit) यांनी जेएनयुच्या (JNU) पहिला महिला कुलगुरु (First female vice chancellor) होण्याचा मान मिळवला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून प्राध्यापक शांतीश्री पंडित यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी पंडित यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

जेएनयूचे कुलगुरु एम. जगदीश (JNU Vice Chancellor M. Jagdish) यांची नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (University Grants Commission) अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. आता जगदीश यांच्याकडून शांतीश्री पंडित (Prof Santishree Dhulipudi Pandit) या आज कार्यभार स्वीकारतील. पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पॉलिटिक्स (Politics) आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विभागात (Department of Public Administration) कार्यरत आहेत. मागील 29 वर्षापासून त्या पुणे विद्यापीठात आहेत.

 

शैक्षणिक प्रवास
प्राध्यापक शांतीश्री पंडित यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास (Presidency College, Madras) आणि कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये (California State University) शिक्षण घेतले. तसेच त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधात एमफिल (MPhil) आणि भारतीय संसद आणि परराष्ट्र धोरण या विषयावर पीएचडी (Ph.D.) केली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून त्यांनी सोशल वर्कमध्ये डिप्लोमाही (Diploma in Social Work) केला आहे. तसेच मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इतिहास (History) आणि सामाजिक मानसशास्त्र (Social Psychology) आणि एमए (MA) राज्यशास्त्रात बी.ए. (BA) पूर्ण केले आहे.

गोव्यातून अध्यापनाला सुरुवात
पंडित यांनी 1988 मध्ये गोवा विद्यापीठातून (Goa University) अध्यापन कामाला सुरुवात केली. त्या 1993 मध्ये पुणे विद्यापीठात दाखल झाल्या. विद्यापीठातील विविध महत्त्वाच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च (ICSSR) या संस्थेच्या सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी आतापर्यंत 29 जणांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे.

 

Web Title :- Prof Santishree Dhulipudi Pandit | SPPU Prof Santishree Pandit appointed Vice Chancellor of JNU

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा