प्राध्यापकास लोखंडी बेल्टने मारहाण

इंदापूर : पाेलीसनामा ऑनलाईन

सुधाकर बोराटे

इंदापूर येथिल कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा पर्यवेक्षक सागर ज्ञानदेव भोसले यांना वर्गातील कामकाज करत असताना वर्गात जावुन दमदाटी व मारहाण करनार्‍या शुभम महादेव मखरे याचे वीरूद्ध इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e099760-bc0c-11e8-bbc6-bf40125e13e5′]

प्राध्यापक सागर भोसले हे गळवार दि. १८ सप्टेंबर रोजी विद्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज करत होते. ते वर्गात परीक्षा सुरू असल्याने कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून काम करत होते. वर्गात परीक्षा सुरू असताना त्यांचे वर्गात शुभम महादेव मखरे. रा. आंबेडकर नगर, इंदापूर. हा विद्यार्थी नसताना, वर्गात अचानक आला. व मला काहीही कारण नसताना शिवीगाळ व दमदाटी करू लागला. मी त्याला शिवीगाळ व दमदाटी करण्याचे कारण काय ? तु वर्गाच्या बाहेर जा असे सांगीतले. त्यावेळी तो वर्गाच्या बाहेर गेला व बाहेरून तु शिवाजी महाराजाच्या पोटचा असशिल तर बाहेर ये असे म्हणाला. त्यानंतर मी पेपर संपल्यानंतर वर्गाच्या बाहेर आलो. महाविद्यालयामध्ये कार्यक्रम असल्याने मी त्या कार्यक्रमास गेलो. तेव्हा महाविद्यालयाचे शिपाई संदेश खाडे यानी मला येवुन सांगीतले की सर तुम्ही महाविद्यालयाचे बाहेर जावु नका. तुम्हाला मारण्यासाठी शुभम मखरे हा महाविद्यालयात प्राचार्य सरांचे केबीन चे बाहेर उभा आहे.
[amazon_link asins=’B00TFGWAA8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36ad5a5a-bc0c-11e8-8364-179ee88cc215′]

मी साधारणत: ११: ३० वाजण्याच्या सुमारास शुभम मखरे याचेकडे गेलो. त्यावेळी शुभम मखरे हा महाविद्यालयाचे परीसरामध्ये उभा राहीलेला होता. मी तेथे गेल्यानंतर त्याला म्हणालो की तु मला मारायला आलास का? तेव्हा त्याने मला पुन्हा दमदाटी करून हातातील लोखडी बेल्टने माझे उजवे हाताचे दंडावर व पाठीवर मारहाण करायला सुरूवात केली. त्यावेळी माझे सहकारी प्रसाद गायकवाड, रोहन व्यवहारे,शेवाळे शिपाई, हे भांडणे सोडविण्यासाठी आले व मला केबीनमध्ये घेवुन गेल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. त्या वेळी शुभम मखरे हा तुझ्यावर अॅट्राॅसीटीचा गुन्हा दाखल करतो असे बोलत निघून गेला बाबतची फिर्याद प्राध्यापक सागर भोसले यांनी शुभम महादेव मखरे याचे विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात दाखल केली असुन पोलीसांनी शुभम मखरे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास इंदापुर पोलीस करत आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.