कौतुकास्पद ! विद्यार्थीनीला शिकता यावं म्हणून प्रोफेसर महिलेनं तिचं मुल 3 तास पाठवर बांधून ठेवलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शिक्षणावर मनापासून प्रेम करणारे तळमळीचे अनेक शिक्षक आपण समाजात पाहतो. जे विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात सर्वतोपरी मदत करण्यास तयार असतात. असेच एक प्रकरण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक महिला विद्यार्थी तिला लहान मुलगा असल्याने वर्गात शिक्षण घेऊ शकत नव्हती, म्हणून प्राध्यापक तिच्या मुलाला सुमारे ३ तास स्वतःच्या पाठीवर बांधून ठेवत. हे प्रकरण जॉर्जियामधील लॉरेन्सविले मधील जॉर्जिया ग्विनेट कॉलेजचे आहे. बायोलॉजीच्या सहाय्यक प्राध्यापकांची मुलगी रमता सिसोको सीस यांनी सोशल मीडियावर हे चित्र पोस्ट केले. सोशल मीडियावरील बर्‍याच लोकांनी या फोटोचे आणि प्राध्यापकाचे कौतुक केले आहे.
proffessor
मुलाला पाठीवर घेतलेल्या प्रोफेसरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आठ दिवसांत हा फोटो किमान ११,००० वेळा रीट्वीट झाला, तर आत्तापर्यंत त्याला ५७ हजार लाईक्स आल्या.

१९ सप्टेंबरच्या घटनेविषयी, रमता यांची मुलगी अन्नाडेटे यांनी लिहिले आहे – ‘माझी आई माझी आदर्श आहे. खरी आफ्रिकन आई असल्याने तिने मुलाला तीन तास वर्गात तिच्या पाठीवरच ठेवले. मला असे वाटते की मी खरंच खूप नशीबवान आहे की मला अशी आई मिळाली जी संपूर्ण जगावर तेवढेच प्रेम करते जेवढे आपल्या मुलांवर करते.’

नेमकं काय घडलं :
मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापक सिसोको तीन तासांचा वर्ग घेत होत्या. त्यांनी सांगितले की त्यांच्या विद्यार्थिनीने त्यांना आधीच फोन करून सांगितले होते की त्यांच्या मुलाची केअरटेकर आजारी आहे. त्यामुळे, ती आपल्या मुलासह वर्गात येईल.

स्वत: प्राध्यापक, जी तीन मुलांची आई आहे, तिने आपल्या विद्यार्थिनीला मुलासह वर्गात येऊ दिले. तो म्हणाला की विद्यार्थिनीचा आत्मविश्वास पाहून आपण तिला मदत करावी असे वाटले. ती मला नैतिक जबाबदारी वाटली. खरं तर, मुल सतत वर्गात फिरण्याचा प्रयत्न करीत होते म्हणून आईला तिच्याबरोबर बसण्यास त्रास होत होता. यानंतर प्राध्यापकाने तिला आपल्या पाठीवर बांधून ठेवले.

Visit : Policenama.com