प्रा. डॉ. विजय देव यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थीप्रिय आणि व्यासंगी प्रा. डॉ. विजय देव यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी १० वाजता त्यांच्या घरी ठेवण्यात येईल. त्यानंतर ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

डॉ. विजय देव हे स. प. महाविद्यालयात प्राध्यापक होते. गो. नी. दांडेकर यांचे ते जावई होत. देव यांच्या पश्चात पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व मधुरा या दोन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. विजय देव हे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते. त्यांच्या निधनामुळे पुण्यातील शिक्षण विश्वावर शोककळा पसरली आहे.