दगडूशेठ गणपती मंदिरात गणेशजन्म सोहळानिमित्ताने विविध कार्यक्रमाची उद्यापासून सुरुवात, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही माघ शुध्द चतुर्थी, मंगळवार दि. २८ जानेवारी २०२० रोजी गणेशजन्म सोहळा दगडूशेठ गणपती मंदिरात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गणपती मंदिरात दि. २८ रोजी पहाटे चार ते सहा स्वराभिषेक कार्यक्रम होणार असून सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर सादर करतील. त्यानंतर सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत गणेशयाग होईल आणि दुपारी बारा वाजता गणेशजन्माचा सोहळा होईल. सायंकाळी सहा वाजता नगरप्रदक्षिणा मिरवणूक निघेल. रात्री साडेआठ वाजता श्रींची महामंगल आरती होईल आणि रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत श्री गणेश जागर करण्यात येईल.

तत्पूर्वी, सोमवार दि. २७ रोजी अथर्वशीर्षावर निरूपण आणि गणेश गीतांचा कार्यक्रम सायंकाळी ४ ते ५.३० वाजेपर्यंत आयोजित केला आहे. प्रा. मुक्ता गरसोळे – कुलकर्णी सादर करणार आहेत. गणेशजन्माच्या दुसऱ्या दिवशी बुधवार, दि. २९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ६या वेळात गणेशजन्म कीर्तन आणि निरूपण होणार असून हभप रविंद्र महाराज चिखलीकर, कीर्तनप्रेमी मंडळ, अरण्येश्वर, पुणे सादर करणार आहेत.

श्री गणेश देवता परिवार .
प्रतिष्ठापना

श्री गणेशाच्या पत्नी देवी श्री महासिध्दी, त्यांचे पुत्र श्री लक्ष, श्री लाभ आणि श्री गणेशरक्षक श्रीनग्न नग्नभैरव महाराज यांच्या चांदीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा गणपती बाप्पांच्या गाभाऱ्यात माघ शुद्ध प्रतिपदा, शनिवार, दि. २५ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ सोहळ्याचे संयोजक असून सोहळ्यात श्री गणेश भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –