लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातून २८ जण हद्दपार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील २८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे यांनी दिली.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) (३) मधील तरतुदींन्वये त्यांना ३० एप्रिलपर्यंत हद्दपार करण्यात आले आहे.

२९ एप्रिल रोजी धुळ्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान भयमुक्त वातावरणात पार पडावे यासाठी ही कारवाई करण्यात आली. आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १३, धुळे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११, चाळीसगाव रोड व मोहाडी उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. हद्दपार केलेल्यांना मतदानाच्या दिवशी सकाळी ८ ते १० या कालावधीत मतदानासाठी सवलत देण्यात आली आहे. असे दराडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातून ३६८ शस्त्रे जमा

लोकसभा निवडणूक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील तब्बल ३६८ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत. असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

 जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्र धारकांकडून शस्त्रे जमा करून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत.  धुळे जिल्ह्यात एकूण परवानाधारक ५४५ आहेत. यात बँक व ज्वेलर्स यांच्या शस्त्रांची संख्या ९६ आहे. त्यानंतर यापैकी ४४९ शस्त्रे जप्त करणे गरजेचे आहे. या ४४९ पैकी ३६८ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.

You might also like