स्वारगेट परिसरातील सराईत गुंड तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्वारगेट परिसरातील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या हद्दीतून २ वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश परिमंडल २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिले आहेत.

मयूर उर्फ अक्षय मनोज कांबळे (वय २४, रा. गुलटेकडी) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मयूर कांबळे हा स्वारगेट पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, दुखापत करणे, असे गुन्हे दाखल आहेत. त्याची स्वारगेट पोलीस ठाण्याच्यासह रायगड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने परिसरात दहशत आहे. त्यामुळे त्याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिले आहेत.

तो तडीपारीच्या काळ्यात शहरात दिसून आल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You might also like