मातंग समाजावरील अन्याय, अत्याचार रोखा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मातंग समाजातील नागरिकांवर अन्याय, अत्याचार होत असल्याने समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा घरचा आहेर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी संबंधित विभागाला कडक निर्देश देण्याची मागणीही केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर अधिवेशनात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी शिष्टमंडळास भेट घेऊन निवेदन दिले होते. यावेळी सचिनजी आरोटे,नितीन दिनकर, चंद्रकांत काळोखे, आनंद खंडागळे, भारत पवार, बालाजी गवारे, भानुदास नेटके, प्रवीण मिसाळ, अमोल कुचेकर, शेखर साळवे, विनायक मोहिते, विलास शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
[amazon_link asins=’B077PWB22Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’538fd38f-872e-11e8-80b2-5b41c9d04e0c’]
निवेदनात गोरखे यांनी म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागात मातंग समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील घटना असेल किंवा आळंदी येथील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या असेल. अशा घटनांमुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाला आहे. मातंग समाज रस्त्यावर उतरुन या घटनांचा निषेध करत आहे. त्यामुळे या विषयामध्ये आपण वैयक्तिक लक्ष घालून समाजावरील अन्याय दूर होण्यासाठी संबंधित विभागाला व अधिका-यांना कडक आदेश देण्यात यावेत. समाजावरील होत असलेले अन्याय व अत्याचार दूर करण्यासाठी तातडीने योग्य ती मदत करावी, अशी मागणी केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्राची त्वरित दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिका-यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील मातंग समाजावर अन्याय झाला असल्यास भविष्यात अन्याय होऊ नये याकरिता संबंधित विभाग तसेच अधिका-यांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री कार्यलयाने गोरखे यांना पाठविले आहे.