श्रीलंकेत झाकीर नाईकच्या पीस टीव्ही चॅनेलवर बंदी

कोलंबो : वृत्तसंस्था – कोलंबोमध्ये ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी साखळी बॉम्बस्फोटात २५३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर ५०० अधिक नागरिक जखमी झाले होते. हा आत्मघातकी हल्ला करणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणाचा प्रभवा असल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे श्रीलंका सरकारने झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या चॅनेलवर बंदी घातली आहे.

झाकीर नाईक हा पीस टीव्हीच्या माध्यमातून तरुणांचे ब्रेनवॉश करतो. तसेच त्या तरूणांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरीत करतो. त्यामुळेच भारत व बांग्लादेशने झाकीर नाईकच्या या चॅनेलवर आधीपासूनच बंदी घातली आहे. श्रीलंकेत झालेल्या बँम्ब स्फोटामध्ये त्याचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याला झाकीर नाईक याचे भाषण ऐकायला आवडत होती. त्याने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ युट्युबर शेअर केला. यामध्ये त्याने श्रीलंकेतील मुसलमान झाकीर यांच्यासाठी काय करू शकतात ? असा प्रश्न विचारला होता. २०१६ मध्ये भारताने झाकीर आणि त्याच्या संघटनेवर बंदी घातली होती. सध्या तो मलेशियात लपून बसला आहे.