एकदिवसातच खडकवासला पाणी आंदोलन स्थगित

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – खडकवासला पाणी वाटपासंदर्भात गाजावाजा करून पुकारण्यात आलेले आमरण उपोषण एक दिवसातच उरकण्यात आले. दौंड तहसील कचेरीसमोर खडकवासला धरणातील हक्काच्या पाण्यासाठी या आमरण उपोषनाला काल सुरुवात करण्यात आली होती.

या आमरण उपोषणाला महेश भागवत, सत्वशील शितोळे, अशोक फरगडे, पांडुरंग मेरगळ ही राजकारणातील दिग्गज मंडळी बसली होती. उपोषण स्थगितीबाबत महेश भागवत यांनी माहिती देताना पुणे शहरातील पाण्याचे नियोजन ११.५० टीएमसी पाण्यात करण्याचे जल नियामक आयोगाचे निकष मान्य करून तेव्हढेच पाणी पुण्याला शासन मान्यतेने पुरवठा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे व इतर मागण्याबाबत शासनाकडून ठोस लेखी आश्वासन देण्यात आले आहे त्यामुळे हे आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले.

या प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, कालवा अधीक्षक अभियंता चोपडे, तहसीलदार बालाजी सोमवंशी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मध्यम मार्ग काढून उपोषण थांबवण्याची विनंती केली होती व त्यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार पूर्ण कार्यवाही होईपर्यंत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे उपोषणकर्त्या आंदोलकांकडून रात्री पावणे तीन वाजता जाहीर करण्यात आले.

 या होत्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या
खडकवासला प्रकल्पातील मुळ आराखड्याप्रमाणे दौंडला पाणी वाटप करावे, खडकवासला मुख्य कालवा, उपकालवा व चारी यांची दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करावीत, कराराप्रमाणे बेबी कॅनॉलच्या २७ फाट्या पर्यंत साडेसहा टीएमसी पाणी शुद्धीकरणकरून ते शेतीसाठी उपलब्ध करावे अश्या आशयाच्या मागण्या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी शासनाकडे केल्या होत्या त्यापैकी काही मागण्या मान्य झाल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले असल्याचे आयोजकांनी जाहीर केले.

आरोग्य विषयक वृत्त –

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

११ राज्यात लवकरच नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या, भाजपच्या ‘या’ ९ बडया नेत्यांची नावे चर्चेत

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

Loading...
You might also like