पुण्यातील सराईत गुन्हेगार तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडल ३ चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी दिले आहेत.

निलेश सुरेश जोगदंड (वय ३४, रा. दांडेकरपुल) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.

निलेश जोगदंड हा दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर बेकादेशीर जमाव जमविणे, जबर दुखापत करणे, मारामारी करणे, गावठी दारूची बेकायदेशीर विक्री करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दत्तवाडी व स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याची परिसरात दहशत असल्याने नागरिक त्याच्याविरोधात तक्रार देण्यास धजावत नव्हते. त्यामुळे त्याला पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.