पुण्यातील सराईत गुंड तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सराईत गुंडाला पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व जिल्ह्याच्या हद्दीतून १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

अमोल संपत वाखारे (२७, कोरेगाव पार्क) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तडीपार करण्यात आलेला अमोल वाखारे हा सराईत गुंड आहे. त्याची कोरेगाव पार्क परिसरात दहशत आहे. त्याच्यावर गंभीर दुखापत करणे, दुखापत करण्याच्या इराद्याने अंगावर धावून जाणे, दंगा करणे, नुकसान करणे, समान उद्देश साध्य करण्यासाठी जमावात सामील होणे असे गंभीर गुन्हे बंडगार्डन, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

त्यामुळे त्याची परिसरात दहशत आहे. त्याच्याविरोधात कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळे त्याला १ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिले आहेत.

Loading...
You might also like