स्वारगेट ते कात्रज मेट्रो चे काम लांबणीवर

पुणे /स्वारगेट : पोलीसनामा ऑनलाइन – स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग एलिव्हेटेड की अंडरग्राउंड (भुयारी) करावा हा निर्णय अद्याप झाला नाही. त्यामुळे या मार्गावरील मेट्रो सुरू होण्यास आणखी विलंब लागू शकतो. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली. सध्या पुणे मेट्रो चे वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते शिवाजीनगर हे काम प्रगतीपथावर आहे. पिंपरी ते शिवाजीनगर हा मार्ग पुढे शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग असणार आहे.

परंतु स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग भुयारी किंवा एलिव्हेटेड करावा या संदर्भात गेल्या दीड वर्षापासून केवळ चर्चा होत आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याविषयी पत्रकारांनी विचारले असता दीक्षित म्हणाले, ” स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा आराखडा अद्याप अंतिम झालेला नाही. आर्थिक आणि वाहतूक या दोन गोष्टींवर विचार सुरू आहे. हा मार्ग भुयारी केला तर त्यासाठी 3600 कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो. तर हा मार्ग एलेव्हेटेड केला तर त्यासाठी दोन हजार कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो.

हा पैसा महापालिका की राज्य सरकार उपलब्ध करून देणार याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. वनाज ते चांदणी चौक या मेट्रो मार्गाचा आराखडा तयार करावा असे पत्र महापालिकेने महा मेट्रोला दिले आहे. त्यानुसार त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी महापालिकेने मेट्रो कडे पाठवलेल्या चार मार्गांच्या प्रस्तावांचा आराखडा तयार केला गेला आहे.

“आज वाघोली येथील लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी रामवाडीच्या पुढे वाघोलीपर्यंत मार्गाचे विस्तारिकरण करावे या मागणीसाठी भेट घेतल्याचे दिक्षित यांनी नमुद केले. टिओडी पॉलिसीविषयी दीक्षित यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पा करीता निधी उभा करण्याच्या दृष्टीने ही पॉलिसी महत्त्वाची आहे. त्याच प्रमाणे स्वारगेट, शिवाजीनगर न्यायालय, वनाज, रेंज हिल येथे महा मेट्रो व्यावसायिक इमारती उभारून त्यातून पैसा उपलब्ध करून घेणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली.


ह्याही बातम्या वाचा –

वीस रुपयांचे नवे नाणे चलनात

पैश्यासाठी डोक्यात मारला रॉड

नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर जाळली

न्यायालयाजवळ गोळीबार प्रकरण : रावण गॅंगचे दोघे गजाआड

अहमदनगर : प्रदीप टाक खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप