उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे बंधू प्रमोद दिवाळखोर घोषित, कधीकाळी मुलीच्या लग्नात खर्च केले होते 500 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी स्टील निर्माता कंपनी आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ प्रमोद मित्तल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका अहवालानुसार प्रमोद मित्तल यांनी कधीकाळी आपली मुलगी सृष्टीच्या लग्नात 500 कोटी रुपये खर्च केले होते, पण आज ते त्यांचे 130 दशलक्ष पौंड कर्ज फेडू शकत नाही आणि शेवटी त्यांना दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आले.

माहितीनुसार, 64 वर्षीय प्रमोद अनेक कर्जाच्या बदल्यात हमीदार होते, परंतु फसवणूकीच्या प्रकरणात अडकल्यानंतर त्यांना कर्ज परतफेड करता आले नाही. वडिलांच्या मालमत्तेवरून लक्ष्मी मित्तल आणि प्रमोद यांच्यात वाद आहे. अशा परिस्थितीत लक्ष्मी मित्तल प्रमोद यांना जामीन मिळवून देण्यास आणि कर्ज फेडण्यास मदत करीत नाहीत. मात्र, यापूर्वी लक्ष्मी मित्तलने त्यांच्या भावाला अनेक वेळा मदत केली आहे. एकदा त्यांनी सुमारे 1600 रुपये देऊन फौजदारी कारवाई टाळली होती. सोबतच प्रमोद यांच्यावर राज्य ट्रेडिंग कॉर्पोरेशनची (एसटीसी) 2,210 कोटी रुपयांची थकबाकी देखील होती.

2019 मध्ये फसवणूकी प्रकरणी प्रमोद मित्तल यांना अटक
यापूर्वी 2019 मध्ये प्रमोद मित्तल यांना बोसनिया येथे संशयित फसवणूक आणि पॉवरचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अटक केली गेली होती. त्यांना बुधवारीच कोर्टात हजर केले जाईल. हे प्रकरण लुकावसच्या ईशान्येकडील शहरातील कोकिंग प्लांट जीकआयएलशी संबंधित फसवणूकीशी संबंधित होते. प्रमोद 2003 पासून एक हजार कर्मचाऱ्यांसह ही फर्म चालवित होते. ते जिकीआयएलच्या पर्यवेक्षी मंडळाचे अध्यक्ष होते. बोसनियाचे सरकारी वकील काजीम सेरहेटलिक म्हणाले की, या प्रकरणात दोषी ठरल्यामुळे 45 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यांचे म्हणणे आहे कि, या संघटित गुन्हेगारी गटाशी संबंधित चौथ्या व्यक्तीविरूद्धही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार मित्तल आणि इतरांवर 28 लाख डॉलरचा (19.32 कोटी रुपये) गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like