राज्यातील 13 पोलीस निरीक्षकांना सहायक आयुक्त/उपविभागीय अधिकारी पदावर बढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्य गृह विभागाने सन 2017 च्या दाखल असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणातील निर्णय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता घेऊन राज्यातील 13 पोलीस निरीक्षकांची सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उपविभागीय अधिकारी या पदावर पदोन्नती केली आहे. त्यांच्या पदोन्नतीचे आणि बदल्यांचे आदेश गुरुवारी सायंकाळी गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले.

बढती देण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आणि त्यापुढील कंसात त्यांची सध्याची नियुक्ती आणि बढतीनंतरचे नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे.

1. उमेश रामचंद्र हजारे (पोलीस निरीक्षक, सातारा ते अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, कोल्हापूर)

2. माधव मारुती मोरे (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

3. प्रकाश गणपतराव हाके ( पोलीस निरीक्षक, चंद्रपूर ते सहायक पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर)

4. भाऊसाहेब बाळासाहेब गायकर (पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य ते अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

5. वसंत मधुकर मोरे (पोलीस निरीक्षक, गुप्तचर प्रशिक्षण शाळा (डीटीएस) नाशिक ते सहायक पोलीस आयुक्त, नाशिक शहर)

6. अभय रामराव पानेहेकर (पोलीस निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता विभाग ते सहायक पोलीस आयक्त दहशतवाद विरोधी पथक, नागपूर)

7. सुकलाल आनदा वर्पे (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

8. संजय मोहन कांबळे (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

9. भागवत बालाजी बनसोडे (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

10. विजय कृष्णराव जाधव (पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, धुळे)

11. विलास बारकु गंगावणे (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

12. पंडीत शंकर थोरात (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)

13. सुनिल एकनाथ सोहनी (पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई)