पोलिस अधिक्षक प्रभाकर बुधवंत यांना पदोन्‍नती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

लोहमार्गचे पोलीस अधिक्षक प्रभाकर बुधवंत यांना राज्य शासनाने बढती दिली असून त्यांची पुण्यात अतिरिक्‍त आयुक्‍त म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने यापुर्वीच त्यांना बढती देणे गरजेचे होते कारण प्रभाकर बुधवंत हे दि. 30 जून रोजीच सेवानिवृत्‍त होत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासुन 14 हून अधिक पोलिस अधिक्षकांच्या बढत्या रखडल्या आहेत. प्रभाकर बुधवंत यांची देखील बढती रखडली होती. अखेर राज्य शासनाने त्यांना सेवानिवृत्‍तीच्या अखेरच्या दिवशी बढती दिली आहे. बुधवंत यांना पुणे पोलिस आयुक्‍तालयात अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त (उत्‍तर विभाग) म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहेत. त्यांच्या बढतीबाबतचे आदेश आजच काढण्यात आले आहेत.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a6a1492b-7c47-11e8-a9c6-595f371b43bd’]

You might also like