‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उत्तर प्रदेशातील वॉन्टेड गुन्हेगार आणि महोबाचे (Mahoba) निलंबित आयपीएस मणिलाल पाटीदार (Suspended IPS Manilal patidar) अद्यापही फरार आहेत. त्यांची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र आता त्यांची राजस्थान आणि गुजरातमधील संपत्ती जप्त (Property confiscated) करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मणिलाल पाटीदार यांची राजस्थान अऩ् गुजरातमध्ये मालमत्ता असून ती जप्त करण्याची तयारी पोलिसांनी सुरु केली आहे. लवकरच यासंदर्भात कोर्टाची (Court) परवानगी घेतली जाईल. मणिलालच्या वडिलांचे राजस्थानच्या डूंगरपूर जिल्ह्यातील गावात एक घर आहे. अहमदाबादमध्ये त्याच्या नावाचा फ्लॅट आहे. नुकतेच प्रयागराजचे एसपी क्राइम आशुतोष मिश्रा (SP Crime Ashutosh Mishra) यांच्या नेतृत्वाखाली एक पथक राजस्थानला जाऊन पाटीदार यांच्या नातेवाईकांची चौकशी केली होती.

काय आहे प्रकरण
मणिलाल पाटीदार (IPS Manilal patidar) हे महोबाचे एसपी असताना कबरई पोलिस ठाणे (Kabrai Police Thane) हद्दीत राहणारा क्रशर व्यावसायिक इंद्रकांत त्रिपाठी (Crusher professional Indrakant Tripathi) याला 8 सप्टेंबर 2020 रोजी संशयास्पदरित्या गोळ्या घालण्यात आल्या होत्या. उपचारादरम्यान इंद्राकांतचा कानपूरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. इंद्रकांत यांच्या निधनानंतर त्याचा भाऊ रविकांत यांनी मणिलाल पाटीदार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

Wab Title :- property suspended ips officer Manilal patidar be seized property rajasthan gujarat

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये