लोकसभा – विधानसभा एकत्र होणार काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवारी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही आचारसंहितेआधीची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याने या बैठकीत विक्रमी ५० निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र उद्याच्या बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे असा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेषतः व्हॉट्सॲपवर हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

काय आहे तो मेसेज –

मुंबई

उद्या मंत्रिमंडळ बैठक, विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता

दोन्ही निवडणुका एकत्र ???

अशा आशयाचा हा मेसेज आहे.

Advt.

दरम्यान , आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधी या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अनेक सत्ताधारी खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघात मतांवर परिणाम करणारे निर्णय घेण्याचा सरकारवर दबाव आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध वर्गाला खुश करण्यासाठी घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र त्या घोषणांमध्ये विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता असून लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रच होणार याविषयी घोषणा करण्यात येणार असल्याचे मेसेज व्हॉट्सॲपवर , फेसबुकवरून फिरत आहेत. परंतु विधानसभा बरखास्त करण्याच्या गोष्टीवर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

धुळे : LCB ची कारवाई ; अफूची शेती करणारे 2 शेतकरी ताब्यात

पीएमपी घेणार ४० बसेस भाड्याने..

बायकोच बोलणं ऐकायला लागू नये म्हणून केलं बहिरेपणाचं नाटक , ६२ वर्षांनतर पत्नी कोर्टात …

कार्तिक-साराचा किसिंगचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

मोदींच्या ‘या’ घोषणेचे काय झाले ? – शरद पवार