या ‘वॅलेंटाईन डे’ ला प्रपोज कसं करू हे सुचत नसेल तर ‘हे’ वाचा, ‘नकार’ बदलेल ‘होकारा’त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रपोज डे साजरा झाला असला तरी अनेकजण असे आहेत जे वॅलेंटाईन डेच्या दिवशीच आपल्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करतात. जनरली मुलंच मुलींना प्रपोज करत असतात. त्यामुळे काहींना असा प्रश्न पडतो की, मुलीला नेमकं कुठे आणि कसं प्रपोज करू जेणेकरून ती आपल्याला होकार देईल. या वॅलेंटाईनला आपल्या स्पेशलवनला तुम्ही किती पद्धतीनं प्रपोज करू शकता हे आपण जाणून घेऊयात. मुलीही प्रोपज करण्यासाठी या पद्धतींचा वापर करू शकतात.

1) ट्रेंजर हंट प्रपोज – ट्रेंजर हंट गेम हा आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रोपज करण्यासाठीचा वेगळा आणि हटके पर्याय आहे. तुमच्या दोघांच्या ओळखीचं असं एक ठिकाण शोधा आणि तिथे एक अंगठी लपवून ठेवा. काहीतरी असं करा की, तुमची आवडती व्यक्ती त्या अंगठीपर्यंत पोहोचेल. यानंतर तुम्ही तिला प्रपोज करा.

2) चाय पे चर्चा नो खर्चा – ही आयडीया तर तुमच्या खिशालाही परवडणारी आहे. जर तुम्हाला आवडणारी व्यक्तीदेखील चहाची शौकीन असेल तर तिला घरीच बोलवा. चहा बनवत असतानाच माहोल बनवा. यानंतर चहा पिताना योग्य वेळ पाहून प्रपोज करून टाका.

3) डेस्टीनेशन प्रपोज – जर तुमच्या खिशाला परवडणारं असेल तर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला शहराबाहेर फिरायला नेऊन प्रपोज करू शकता. या निमित्तानं तुमची एक टूर देखील होईन जाईल. तिला स्पेशल पिकनिकला नेऊन प्रपोज करा.

4) प्रेमपत्र लिहा – आज पत्राचा जमाना राहिला नाही असं अनेकजण म्हणतात. सध्या सगळं काही डिजीटल झालं आहे. अशात जर तुम्ही एखादं प्रेमपत्र लिहिलंत तर हा हटके प्रपोज होऊ शकतो. कारण आजकाल तसंही प्रेमपत्र लिहिण्याचं प्रमाण कमी झाल्याचं दिसत आहे. यामुळे तुमची प्रेयसी आणखी प्रभावित होईल. या प्रेमपत्रासोबत दोघांचा एक फोटोही असू द्या. यामुळे प्रपोजलला चार चांद लागतील.

5) लाँग ड्राईव्ह – एखाद्या थंडगार ठिकाणी तिला लाँग ड्राईव्हला न्या. एखादा छान स्पॉट पाहून गुडघ्यावर बसत हात पकडत रोमँटीक अंदाजात प्रपोज करत तिला आपल्या मनातलं सांगा.

6) समुद्रकिनारी गाणं गा- तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला समुद्रकिनारी फिरायला न्या. गप्पा मारता मारता गाणं गाता गाता रोमँटीक वातावरण तयार करा. अशात वेळ पाहून तिला रोमँटीक प्रपोज करा. तिला जर आवडलं तर ती झप्पी मारूनही तुम्हाला होकार देऊ शकते.