पुणे-नगर महामार्गालगत असणार्‍या वृंदावन लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

शिक्रापुर : शिरुर तालुक्याच्या रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा चौकातील पुणे- नगर महामार्गालगत लगत असणाऱ्या वृंदावन लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहीती मिळाल्याने रांजणगाव MIDC पोलिसांनी या लाॕजवर छापा टाकत दोन जणांना अटक केली असुन यावेळी एका महिलेच्या मदतीने ते वेश्या व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले असुन लॉजचा मॅनेजर गुणाकार कृष्णप्पा शेट्टी आणि लालासो दत्तात्रय शेंडगे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव MIDC जवळील राजमुद्रा चौकात असणाऱ्या हॉटेल वृंदावन येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार (दि ७) रोजी मध्यरात्री १ च्या सुमारास पोलिसांनी एका व्यक्तीला बनावट गिऱ्हाईक बनवून लॉजवर पाठवले असता त्या व्यक्तीने हॉटेल वृंदावन येथील मॅनेजर गुणाकार शेट्टी यास महिलेची मागणी केली. त्यावेळी गुणाकार शेट्टी आणि लालासो शेंडगे यांनी त्यास हॉटेल मधील एका खोलीत जायला सांगितले. त्यावेळेस त्या बनावट गिऱ्हाईकाने हॉटेलच्या बाहेर येऊन पोलिसांना इशारा केला.

त्यावेळेस पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता. तेथे वेश्याव्यवसाय करणारी पिडीत महिला आढळुन आली. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता. गुणाकार कृष्णपा शेट्टी (वय ४६) रा. वृंदावन लॉज, रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे व लालासो दत्तात्रय शेंडगे (वय ३०) रा. शेळकेवाडी शिवणे, ता. सांगोला, जि. सोलापुर या दोघांनी संगनमताने त्या पिडीत महिलेस स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेल वृंदावन येथे ठेऊन तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे निष्पन्न झाले असुन या दोघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशानुसार रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, उपनिरीक्षक संदीप येळे, पोलीस नाईक विनायक मोहिते, पोलीस शिपाई रघुनाथ हळनोर, धनश्री जाधव, विजय शिंदे यांनी केली.