Pimpri News : स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्पा सेंटरच्या (Spa Center) नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex racket) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दापाश केला आहे. या कारवाईत पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपळे सौदागर येथील नाशिक फाटा रोडवरील गणेशम बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावरील कुनल्या थायी स्पा सेंटर येथे करण्यात आली.

विनोद विश्वनाथ घाटोळकर (वय-34 रा. जामा मस्जीद समोर, गोकुळधाम हौसींग सोसायटी पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. तर स्पा सेंटरचा मालक भरत पवार (वय-27 रा. काळेवाडी) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विजय लक्ष्मण कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवरी पिटा ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून नाशिक फाटा रोडवरील स्पा सेंटरमध्ये छापा टाकाला. यावेळी आरोपी हे पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. पोलिसांनी पीडीत महिलांची सुटका करून स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक केली आहे तर स्पा सेंटरचा मालक फरार झाला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.