सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या ‘त्या’ तरूणीची सुटका, न्यायालयाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका सज्ञान महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध एका ठिकाणी डांबले जाऊ शकत नाही. घटनेने बहाल केलेल्या अधिकारानुसार नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार कुठेही वास्तव्य करण्याचा अधिकार आहे. अन्य कायद्यांपेक्षा घटनेला अधिक महत्त्व आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची पुण्याच्या शासकीय महिला सुधारगृहातून सुटका केली.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, पीडिता आणि तिच्याबरोबर असलेल्या अन्य महिलांना पंढरपुरातील एका लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करताना पंढरपूर तालुका पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या महिलांना या व्यवसायात येण्यास भाग पाडल्याने पोलिसांनी त्यांना आरोपी न करता त्यांना पीडिता ठरवून पुढे दंडाधिकाऱ्याच्या आदेशानुसार पुण्यातील बारामती येथील एका शासकीय महिला सुधारगृहात ठेवले.

पीडित तरुणीच्या मानलेल्या आईने तिचा ताबा दंडाधिकाऱ्याकडे मागितला. मात्र त्यांनी नकार दिला. संबंधित महिलेने या निर्णयाला अतिरिक्त सत्र न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सत्र न्यायालयानेही तिला दिलासा देण्यास नकार दिला. अखेर त्या महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. पीडित महिलेच्या मूलभूत अधिकारांवर पोलिसांनी गदा आणली आहे. एका सज्ञान महिलेच्या जाण्या-येण्यावर कोणी बंधन घालू शकत नाही. तिच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्तीच्या वकिलांनी न्यायालयात केला.

घटनेच्या अनुच्छेद १९ नुसार, कोणताही भारतीय नागरिक देशात कुठेही जाऊ-येऊ शकतो आणि त्याच्या इच्छेनुसार देशात कुठेही वास्तव्य करू शकतो. एखाद्या सज्ञान व्यक्तीवर याबाबत बंधन आणले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत न्या. संदीप शिंदे यांनी पंढरपुरातील एका लॉजमध्ये वेश्याव्यवसाय करताना रंगेहाथ पकडलेल्या २२ वर्षीय तरुणीला बारामतीच्या शासकीय महिला सुधारगृहातून सोडण्याचा आदेश पोलिसांना दिला.

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

Loading...
You might also like