घरातून चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – राहते घरातून वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी गुन्हे शाखा एकच्या पथकाने छापा मारून चार मुलींची सुटका केली तर एकाला अटक केली.  गुरुवारी (दि. 17) भारतनगर, दिघी येथे ही कारवाई केली.

कैलास पांडुरंग रेंगडे (रा. भारतनगर, दिघी) असे अटक करण्यात आलेल्या घरमालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून चार तरुणींची सुटका केली आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे कर्मचारी दिघी परिसरात गस्त घालीत असताना दिघी येथील भारतनगर परिसरात एका घरामध्ये सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सावन राठोड यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्या घरावर छापा मारला. यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी चार तरुणी मिळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता रेंगडे हा त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची कबुली त्यांनी दिली.

पोलिसांनी तात्काळ रेंगडे यास अटक केली. त्याच्याकडून वेश्याव्यवसायासाठी वापरण्यात येणारे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. हि कारवाई पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

You might also like