शहरात ‘हाय प्रोफाईल’ सेक्स रॅकेट आणि ‘स्पा’चा धंदा जोरात, लवकरच ‘SS सेल’ अक्टिव्ह ?

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडच्या बाजूला असणाऱ्या पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरु असणाऱ्या देहविक्री आणि ‘स्पा’च्या नावाखाली सुरु असलेल्या गोरख धंद्यावर पोलिस कारवाई करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातही हाय प्रोफाईल सर्व्हिस आणि ‘स्पा’च्या नावाखाली अनेक ठिकाणी वेगळेच ‘मसाज’ सुरु आहे. मात्र याकडे सर्वांनी कानाडोळा केला असून सर्वकाही जोरात सुरु आहे.

राज्यासह पुणे शहरात हाय प्रोफाईल सर्व्हिस देणाऱ्या धंद्यावर तसेच मोठ्या हॉटेलमध्ये कारवाई केलेली आहे. स्पा च्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्री व अन्य प्रकारच्या ठिकानावर छापे मारण्यात आले आहेत. यामध्ये परदेशी, परराज्यीय मुलींची सुटका करण्यात आलेली आहे. मोठ्या स्वरुपात कारवाई करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांनी सर्वच पोलिस अधिकाऱ्यांना अवैद्य धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मटका, जुगार, दारु गाळप-विक्री होत असलेल्या ठिकाणी कारवाई केली असून ते सत्र सुरुच आहे. मात्र शहरात आजही हाय प्रोफाईल ‘देहविक्री’चा धंदा सुरु आहे. शहरातील अनेक भागात सर्व्हिस दिली जात आहे.

यामध्ये आणखी एकाची भर पडत आहे. अनेक ‘स्पा’ सेंटर मध्ये वेगळेच प्रकार सुरु आहेत. ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर देऊन आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मोठ्या संख्येने शहरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘स्पा’ असून यातील अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रकार सुरु आहेत. अश्यांवर अद्याप कारवाई झालेली दिसत नाही. यातील काही नियमानुसार स्पा चालवत आहेत. या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सामाजिक सुरक्षा पथकाची वेगळी स्थापना होण्याची शक्यता आहे.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

You might also like