गेस्ट हाऊसमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 4 महिलेसह 10 जणांना अटक

ग्रेटर नोएडा : वृत्तसंस्था – ग्रेटर नोएडा येथे दोन गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तेथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा टाकून कारवाई केली आहे. गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकासह ४ महिलांसह १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी कसना पोलिसांच्या पथकाने इकोटेक वन पोलिसांसह २ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारीची कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. छाप्यादरम्यान प्रशांत गेस्ट हाऊस आणि प्रधान गेस्ट हाऊसमध्ये उघडपणे वेश्याव्यवसाय सुरू होता. सापळा रचून पोलिसांनी छापा टाकला आणि आरोपींना पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ महिला आणि ६ तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर प्रशांत गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अशी माहिती पोलीस अधिकारी विशाल पांडे यांनी दिलीय.

दरम्यान, बर्‍याच काळापासून शहरातील स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे, त्यामुळे एसपी आलोक सिंग यांनी शहरातील सर्व स्पा सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर या छापेमारी वेळी पोलिसांना गेस्ट हाऊसमधून अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय गेस्ट हाऊसच्या रूममधून पोलिसांनी १५,६२० रुपये जप्त केले आहेत. तर या सेक्स रॅकेटचे जाळे देशातील इतर राज्यांशीही जोडलेले असल्याचे पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.