बारामती : भर वस्तीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एकावर गुन्हा दाखल

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन –   शहरातील भरवस्तीत एका सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश बारामती तालुका पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी रविवारी (दि. 28) कारवाई करत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक सुरेश ठोंबरे (रा. सूर्यनगरी, बारामती) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एका महिलेची त्याच्या ताब्यातून पोलिसांनी सुटका केली आहे. बारामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिगवण रस्त्यावर एका सदनिकेत रविवारी वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती.त्यासाठी बनावट ग्राहक तयार ठोंबरे याच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांनी येथे उपस्थित असलेल्या महिलेला तिचे नाव विचारले. त्यावेळी प्रतिक ठोंबरे याने पैशाचे आमिष दाखवत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे तिने सांगितले. या 28 वर्षीय महिलेची पोलिसांनी सुटका केली. घटनास्थळावरून पोलिसांनी मोबाईल व अन्य साहित्य असा 11 हजाराचा ऐवज जप्त केला आहे.