स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘हायप्रोफाईल’ सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ !

मिरारोड : पोलीसनामा ऑनलाईन – स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा काशिमीरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी व्यवस्थापक महिलेला अटक केली असून मालकाचा शोध सुरु आहे. ही कारवाई पेणपाड्यातील अजित पॅलेस हॉटेल गल्लीतील डि पॅरेडाईज या ठिकाणी करण्यात आली आहे.

डि पॅरेडाईज या नावाने चालवण्यात येणाऱ्या या स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठवला. स्पामधील व्यवस्थापक चित्रा संजय माने (रा. वसई) वेश्या व्यवसायासाठी चार मुली उपस्थित केल्या.

चित्रा माने याने त्या ग्राहकास एका तरुणीचा व्यवहार साडेतीन हजार रुपयांत केला. व्यवहार पक्का झाल्यावर ग्राहकाने बाहेर सापळा रचून बसलेल्या पोलिसांना इशारा केला. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून चित्रा मानेला अटक केली. तर चार तरुणींची सुटका केली. चित्राकडे चौकशी केली असता हे स्पा सेंटर हनिफ शेख याचे असल्याचे सांगितले. या कारवाईनंतर स्पाचा मालक शेख फरार झाला आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

 

 

Loading...
You might also like