मीरारोड : लॉजमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन – वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या लॉजिंग बोर्डींगवर पोलिसांनी छापा टाकून दोन पिडीत मुलींची सुटका केली. तर दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हनुमान मंदिर लगत असलेल्या माय होम या लॉजिंग बोर्डींगवर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली.

शंकर चिंतामण यादव (37) रा. सेक्टर, 2 शांती नगर व वेटर बबलू साव (25 ) दोघांना पिटा कायद्याखाली अटक केली आहे. तर लॉजचा चालक किरण मकवाना ह्याला अटक करणे बाकी आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हनुमान मंदिर लगत असलेल्या माय होम या लॉजिंग बोर्डिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय पवार, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन पोतदार व पोलीस पथकाने सापळा रचला. वेश्याव्यवसाय साठी वेटर आदींनी पैसे घेतल्या नंतर लॉजवर धाड टाकली असता वेश्याव्यवसाय साठी ठेवलेल्या दोन पीडित मुली आढळून आल्या. पोलिसांनी त्या दोन्ही मुलीची सुटका करून दोघा दलालांना अटक केली आहे. मीरा भाईंदर शहर हे लॉजिंग बोर्डिंग व ऑर्केस्ट्रा बारच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायामुळे कुप्रसिद्ध बनले आहे.

You might also like