पोलीस कर्मचार्‍याने भाड्याने दिलेल्या घरात ‘सेक्स’ रॅकेट, पर्दाफाश

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर वाघनगरातील शिक्षक कॉलनीतील एका घरावर छापा घातला. तेथे घरमालक, मालकीन, दोन तरुणी अशा चार जणांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यावर हे घर एका पोलीस कर्मचार्‍याचे असल्याचे निदर्शनास आले. या पोलीस कर्मचार्‍याने ते भाड्याने दिले होते. आपल्या घरात असा प्रकार होत असल्याचे पाहून या पोलीस कर्मचार्‍यालाही धक्का बसला आहे.

या पोलीस कर्मचार्‍याने एका रिक्षाचालकास हा फ्लॅट भाडयाने दिला होता. तो पत्नीसह या घरात रहात होता. नांदूरा व सुरत येथील दोन तरुणींच्या माध्यमातून तो कुंटणखाना चालवत होता.