अकोला : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहव्यापार, डॉक्टरसह तिघांना अटक

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील सुशिक्षित वस्तीत आरोग्य सेवा केंद्र (health care centre) च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या डॉक्टरसह तीघांना शुक्रवारी रात्री उशीरा रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. तेथील पोलीस अधिक्षकांच्या दहशतवादविरोधी पथकाने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील सुशिक्षित भाग म्हणून गणल्या जाणाऱ्या जवाहर नगर भागात तेजस्वी हेल्थ केअर सेंटर आहे. या ठिकाणी डॉ. प्रदीप देशमुखने महिलांच्या माध्यमातून देह व्यापार मांडल्याची अशी माहिती दहशतवादविरोधी पथकास मिळाली.

दहशतवादविरोधी पथक प्रमुख विलास पाटील यांनी माहीतीची तपासणी केली असता, त्यानंतर शहर पोलीस अधीक्षक सचिन कदम यांच्या नेतृत्वात या तेजस्वी हेल्थ केअर सेंटरवर शुक्रवारी मध्यरात्री उशीरा छापा टाकण्यात आला. यावेळी डॉ. प्रदीप देशमुख याच्यासह त्याचे सहकारी संतोष सानप, रतन लोखंडे व पिडीत महिलेस ताब्यात घेतले आहे. पथकाच्या तक्रारीवरून सिव्हील लाइन पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.