Pimpri News : पिंपरी अन् भोसरीत 3 लॉजवर पोलिसांचा छापा ! 7 महिलांची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –   वेश्याव्यवस्या सुरू असलेल्या 3 लॉजवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यानंतर 7 महिलांची सुटका करण्यात आली आहे. पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. 15 संशयित आरोपींवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. सागर कवडे यांनी दिलेली माहिती अशी की, पिंपरी आणि भोसरी येथील लॉजवर काही महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिटी प्लाझा लॉज, काळेवाडी रोड, पिंपरी व कल्पना लॉज, गोकुळ हॉटेलजवळ तसंच भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल कावेरी लॉज, दिघी रोड, भोसरी या तीन लॉजवर पोलिसांनी छापेमारी केली. ज्या महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता अशा 7 महिलांची पोलिसांनी सुटका केली.

हॉटले सिटी प्लाझाचे चिरंजीत देवाशीश सरकार (वय 25), जय भीमबहाद्दर विश्वकर्मा (20), तिलक कर्ण थापा (19), आकाश प्रदीप बिशी (22), प्रविण जयसिंग गंगावणे (60, रा. सिटी हॉटेल, काळेवाडी रोड, पुणे), अब्दुल हमीद (रा. मोरवाडी चौक), कल्पना लॉजचे जयकुमार श्रीगणेश यादव (25), अजितकुमार श्रीउतीन साव (35, दोघंही रा. कल्पना लॉज पिंपरी), बबलू प्रसाद, जयराम अण्णा गोड्डा, शांता पुजारी उर्फ छोटू, दीपक कटारिया (रा. पिंपरी) तसंच हॉटेल कावेरी लॉजचे गोपाळ लिंबा पाटील (25), समाधान प्रकाश वाघ (26, दोघंही सध्या रा. कावेरी हॉटेल, दिघी रोड, भोसरी) बाळाअण्णा शेट्टी (हॉटेलचालक) यांच्याविरोधात पिंपरी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या पथकानं ही कामगिरी केली.