Prostrate Cancer Prevention | लाईफस्टाईलमध्ये ‘या’ 5 बदलांमुळे कमी होऊ शकतो प्रोस्टेट कॅन्सरचा धोका!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रोस्टेट कॅन्सर जगातील चौथा सर्वात सामान्य कॅन्सर (Prostrate Cancer Prevention) आहे, ज्यास पुरुष बळी पडतात. आक्रोडच्या आकाराची एक प्रोस्टेट नावाची छोटी ग्रंथी वीर्याचे उत्पादन करते. प्रोस्टेटमध्ये कॅन्सरच्या (Prostrate Cancer Prevention) पेशी वाढल्याने लघवीला त्रास, स्खलन, वारंवार लघवीला येणे आणि लघवीतून रक्त अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

 

या आजाराची जोखीम वयासोबत आणखी वाढते. प्रोस्टेट कॅन्सरचे बहुतांश रूग्ण 65 पेक्षा जास्त वयाचे असतात. वयासह इतरही कारणे आहेत जी या कॅन्सेरियस सेल्सच्या वाढीला कारणीभूत ठरतात – जसे की आहार आणि जीवनशैली संबंधित सवयी. जीवनशैलीत काही बदल करून प्रोस्टेट कॅन्सरची जोखीम कमी करू करता येऊ शकते (5 lifestyle changes can reduce the risk of prostate cancer!).

 

आहार आणि जीवनशैली संबंधी या 5 सवयी लक्षात ठेवा

 

1. लो-फॅट डाएट घ्या (Eat a low-fat diet)
निरोगी जीवन जगण्यासाठी आहारात नट्स, तूप, मासे या सारख्या चांगल्या फॅट्सचा समावेश करा. तळलेले व जंक फूड बंद करा. चांगले फॅटचे सेवन सुद्धा मर्यादित करा.

 

2. फळे आणि भाज्या सेवन करा (Eat fruits and vegetables)
आहारात फळे आणि भाज्यांचे सेवन करा. यातील विविध व्हिटॅमिन आणि खनिजे प्रोस्टेट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

 

3. हेल्दी वजन कायम राखा (Maintain a healthy weight)
वजन नियंत्रणात ठेवा. कारण, जास्त वजन किंवा लठ्ठपणा प्रोस्टेट कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढवतो.

 

4. रोज व्यायाम करा (Exercise daily)
समाजात एक अतिशय चुकीचा समज पसरलेला आहे, तो म्हणजे व्यायाम हा केवळ वजन कमी करण्यासाठी केला जातो. निरोगी जीवनासाठी सुद्धा नियमित व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे. (Prostrate Cancer Prevention)

 

व्यायाम केल्याने तुम्ही प्रोस्टेट कॅन्सर, हृदयाचे आजार आणि अशा क्रोनिक रोगांची खोजीम कमी करू शकता. आपले वजन आणि कॅलरीचे योग्य संतुलन राखण्यासाठी सुद्धा व्यायाम आवश्यक असतो. रोज किमान 30 मिनिटांच्या वर्कआऊट आवश्य करा. (Prostrate Cancer Prevention)

 

5. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग सोडा (Quit smoking and drinking)
खुप जास्त प्रमाणात स्मोक आणि ड्रिंक करणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते.
यासाठी जर तुम्हाला सुद्धा या गोष्टींची सवय असेल तर चांगले आहे की, त्या वेळीच सोडून द्या.

 

या दोन्ही गोष्टी तुमचे इम्यून फंक्शन कमजोर बनवतात, ज्यामुळे तुम्ही सहजपणे आजारी पडू शकता.
दारूचे सेवन तुम्ही आठवड्यात एकवेळा करू शकता, परंतु स्मोकिंग पूर्णपणे सोडण्याची आवश्यकता असते.

 

Web Title :- Prostrate Cancer Prevention | lifestyle changes that can reduce risk of prostrate cancer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

DBSKKV Ratnagiri Recruitment 2021 | कृषी क्षेत्रातील उमेदवारांना नोकरीची संधी ! ‘या’ कृषि विद्यापीठात लवकरच भरती; पगार 35,000 रूपयांपर्यंत

Balasaheb Murkute | BJP च्या माजी आमदाराचा MSEB कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

DGP Sanjay Pandey | UPSC पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये ‘या’ तीन अधिकाऱ्यांची नावे, DGP संजय पाडे यांचे नावच नाही